हिंगणघाट बचाव समितीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
प्रशांत जगताप प्रतिनिधी
हिंगणघाट:- तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायी असलेले हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था पूर्णत राम भरोसे सुरू असल्याचे समोर येत आहे.
हिंगणघाट तालुक्यातील शेकडो गावातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून सुसज्ज अस उप जिल्हा रुग्णालय बांधण्यात आले. सुरुवातीला या रुग्णालयात चांगली सेवा मिळत होती मात्र मध्यतरी काही वर्षांपासून या रुग्णालयाकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णाच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बहुतेक गरीब रुग्णाला चांगल्या आरोग्य उपचार मिळत नाहीत. गरज नसताना गोर गरीब नागरिकांना जिल्हा रुग्णालय वर्धा, सेवाग्राम, सवांगीला जायला सांगितले जाते. मग एवढे मोठे रुग्णालय कशासाठी आहे? येथील डॉक्टर केवळ पगार घेण्यापूरते येथे आहेत काय?
आज हिंगणघाट तालुक्यात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. साथीचे रोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत आहे. मात्र येथील रूग्णालयात असलेल्या डॉक्टराना याचे गांभीर्य नाही. येथे आलेल्या रुग्णावर व्यवस्थित उपचार केले जात नाही अशी माहिती रुग्णाचा नातेवाईकांनी महाराष्ट्र संदेश न्युजला दिली.
हिंगणघाट बचाव समिती तर्फे उपजिल्हा रुग्णालयचा भोंगळ कारभारा बाबत हिंगणघाट येथील उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून त्यात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. येथील ग्रामीण व शहरातील मोठ्या प्रमाणात उपचारासाठी रुग्ण येत असून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे कोणतेही डॉक्टर उपलब्ध राहत नसून रुग्णांना तासनतास डॉक्टरांची वाट पहावी लागत असते उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी, औषधीची कमतरता व रुग्णालयामधील डॉक्टर लोकांची खाजगी दवाखाने चालवीत असल्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहे याचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंगणघाट बचाव समितीने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनूले यांना निवेदन देऊन शासकीय यंत्रणा सोबत घेऊन बैठकीचे आयोजन करावे अन्यथा उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आला.
यावेळी सुनील डोंगरे, अनिल मून दिनेश वर्मा, रुपेश राजूरकर, मनोज रुपारेल, गजू कुबडे, धनराज कुंभारे, अनिल भोंगाडे, मनोज वासेकर, श्याम इडपवार, दर्शन बाळापुरे, चंद्रकांत नंनदकर, राहुल शिंगरु, राजू रूपारेल, तुषार हवाईकर, दीपक माडे, राकेश झाडे, अमन काळे संजय खत्री, मुजीब शेख, नारायण राखुंडे व इतर सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.