पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
पुणे :- दि. २४/०१/२०२३ रोजी २१/०० ते दि. २५/०१/२०२३ रोजी ०१/०० वा पर्यंत चंदननगर पोस्टें हद्दीत कोम्बींग ऑपरेशनचे अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी पोउनि कुमरे व पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, गणेश हांडगर, महेश नाणेकर, विकास कदम, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, शेखर शिंदे, असे साध्या वेशात पेट्रोलिंग करत असताना आंबेडकर वसाहत चंदननगर पुणे या ठिकाणी आले असता पोलीस अंमलदार जाधव व कोद्रे यांना बातमी मिळाली की, चंदननगर पो.स्टे. गु.र.नं. ४१/ २०२२ भादवि कलम ३७९ मधिल चोरीस गेलेल्या बजाज सीटी १०० गाडी सारखी गाडी घेवुन दोन संशयीत इसम नागपाल रोडचे दिशेने येत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे तेथे आडबाजुला दबा धरून बसले असता सदरचे वर्णनाप्रमाणे बजाज गाडी घेवुन दोन इसम मातोश्री सोसायटी नागपाल रोड कडे भरधाव वेगाने येताना दिसले असता त्यांना स्टाफने थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलीस असल्याची चाहुल लगाल्याने त्यांनी मोटारसायकल न थांबवता पुढेत वेगात निघुन जात असाताना स्टाफने त्यांचा सिने स्टाईल पाठलाग करून त्यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांना पोलीसांनी आपली ओळख सांगुन त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) प्रणव प्रभात शर्मा, वय २५ वर्षे, रा. आनंदपार्क वस्ती, सणसवाडी, ता. शिरूर जि. पुणे २) रोहित मुकेश सिंग, वय १८ वर्षे, रा. आनंदपार्क वस्ती, सणसवाडी, ता. शिरूर जि. पुणे असे सांगितले असता त्यांचे गाडीला नंबर नसल्यामुळे त्यांचेकडे सदर गाडी बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गाडीचा चॅसी नंबर व इंजिन नंबर चेक केला असता चॅसी नं DUFBLH66120 इंजिन नंबर DUMBLH51575 हे चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं ४१ /२०२२ भादवि कलम ३७९ मधिल चोरीस गेले गाडीचेच असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गाडीसह त्यांना पुढील चौकशी करीता चंदननगर पोलीस स्टेशन आणुन त्यांना अधिक विश्वासत घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी चंदननगर पो.स्टे गु.र.न ४१६ / २०२२ भादवि कलम ३७, ४६६ / २०२२ भादवि कलम ३७९ मधिल दोन गाड्या चोरल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडुन चंदननगर पो स्टे कडील एकुण तीन गुन्हे उघड झाले असुन त्यांचेकडुन एकुण ७३,०००/- रू चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो श्री रितेश कुमार पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त सो श्री संदिप कर्णीक, पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त सो परि. ४ श्री. शशिकात बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. किशोर जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, विकास कदम, शेखर शिंदे यांनी केलेली आहे.

