पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
पुणे :- दि.२८/०१/२०२३ रोजी चंदननगर पो स्टे कडील तपास पथकातील प्रभारी अधिकारी अरविंद कुमरे, पोलीस अमलदार अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, नामदेव गडदरे असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सचिन रणदिवे व नामदेव गडदरे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन कडील भादवि कलम ३०७ मधिल पाहिजे असलेला आरोपी- अश्पाक ढवळगी हा चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील चौधरीवरतीकडे जाणारे रोडवर उभा आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर बातमी बाबत माहीती वरिष्ठांना कळवून त्याप्रमाणे वरिष्ठांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकातील अधिक स्टाफ बोलावून घेवुन सर्वजन दुर्गा माता मंदीराचेसमोर चौधरी वस्तीकडे जाणारे रोडचे कडेला जावुन पाहणी केली असता तेथे बातमीतील मिळालेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम दिसल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अमीन मुस्तफा तवळगी ऊर्फ अश्पाक वय १९ वर्षे, रा. स.नं १२. लक्ष्मी नगर येरवडा पुणे असे असल्याचे संगितल्याने त्यास चौकशी करीता चंदननगर पोलीस स्टेशनला आणुन अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क, विमानतळ, दत्तवाडी, कोंढना या पो.स्टे कडील गुन्हयामधुन फरार असल्याची कबुली दिल्याने पोलीसांनी सदर पोलीस स्टेशन कडील अभिलेख चेक केला असता त्याचेवर ५) विश्रांतवाडी पो स्टे गुरु. २७४ / २०२१ भादवि कलम ३०७, २) कोरेगावपार्क पोरटे गु.र.न. १२८/२०२२ मादपि फलम ३०७, ३) विमानतळ पोरटे गुरन ४९५ / २०२२ मादवि कलम ३२४, १४१, १४३, १४६, १४७, १४८, १४९, दत्तवाडी पोलिस स्टेशन गु.र.न. १८१/२०२२ मादवि कलम ४५४,४५७,३८० या गुन्हयांमध्ये फरार असल्याची माहीती मिळाली असून सदर आरोपीस पुढील तपास कामी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या चाव्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो श्री रितेश कुमार पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त सो श्री संदिप कणीक, पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त सो परि ४ श्री शशिकात बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. किशोर जाधव सो याचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर, पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार अविनाश सकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, नामदेव गढ़वरे, सुभाष आव्हाड, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, विकास कदम यांनी केलेली आहे..

