निखील पिदुरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक हळहळनारी दुर्दैवी घटना समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आवाळपूर परिसरात असलेल्या अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या कृत्रिम तलावात तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ माजली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोरपणा तालुक्यातील आवळापुर येथिल राहणारे पारस सचिन गोवारदिपे वय १० वर्ष, दर्शन शंकर बशाशंकर वय १० वर्ष व अर्जुन सुनील सिंग वय १० वर्ष तिघेही रा.अल्ट्राटेक कंपनी वसाहत हे तीन मुलं बेपत्ता झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या मुलांचा शोध घेतला असता अल्ट्रटेक परिसरात असलेल्या कृत्रिम तलावात त्या मुलांचे कपडे मिळाले. आवळापुर अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील शाळेत शिकणारी १० वर्षाची तीन मुलं सायंकाळपर्यंत घरी परतली नाहीत. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी मुले बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली.
दरम्यान, तक्रारीनुसार पोलिसानी तातडीने तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी मुलांच्या शाळेच्या परिसरात तपास केला असता, त्या शाळेच्या म्हणजेच अल्ट्राटेक वसाहतीच्या परिसरात असलेल्या पाण्याने भरलेला गड्याच्या शेजारी त्या मुलांचे कपडे सापडले. त्यामुळे संबंधित परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कदाचीत या गड्यात बुडून या मुलांचा मृत्यू झाला असावा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप या मुलांची माहिती मिळाली नसून, पोलीस युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत.
पारस सचिन गोवारदिपे वय १० वर्ष, दर्शन शंकर बशाशंकर वय १० वर्ष व अर्जुन सुनील सिंग वय १० वर्ष तिघेही रा.अल्ट्राटेक कंपनी वसाहत अशी मृतकांची नावे आहेत. हे तिघेही आदित्य बिर्ला पब्लिक स्कूलमध्ये चवथ्या वर्गात शिकत होते. गुरुवारी गणराज्य दिनाच्या दिवशी पारस, दर्शन व अर्जुन ही मुले कृत्रिम तलावामध्ये संध्याकाळच्या वेळेला पोहण्यासाठी गेली. मात्र, अंधार पडल्यानंतरही घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध केली असता, तलावाच्या काठावर तीनही मुलांच्या चपला आणि कपडे आढळून आले. त्या दृष्टीने पोलिस प्रशासनाला पाचारण करून पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधाशोध सुरू झाली. मात्र, पाणी अथांग असल्यामुळे शिवाय रात्रीचा वेळ असल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.