संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा 9 ऑगस्टखलील वृत्त या प्रमाणे आहे बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना व स्काऊट – गाईड युनिट मार्फत सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रम वृक्षासोबत साजरा करण्यात आला. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णयानुसार भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार दिनांक 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता एकाच वेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात यावे असे नमूद करण्यात आले होते. आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना( इको क्लब ) व स्काऊट – गाईड च्या विद्यार्थ्यांनी बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट लीडर यांच्या मार्गदर्शनात वृक्षासोबत सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व पर्यावरण संवर्धणाची आवड निर्माण व्हावी तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक, समाजसुधारक, राष्ट्र प्रेमींची माहिती विध्यार्थीना मिळावी या करिता आदर्श शाळेत विविध उपक्रम राबाविले जात आहेत. चित्रकला, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, श्रमदान व स्वच्छता अभियान, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या करिता शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका व विध्यार्थीचे सहकार्य लाभत आहे.