देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- प्रियदर्शनी इंदिरा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल महाजनवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रमूख पाहुण्यांच्या उपस्थितीत आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून तेजस्विनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली केळकर, शाळेचे संचालक धर्मेंद्र कोहाड, मधुकरराव घोडमारे व परिसरातील पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेत्यांच्या वेशभूषेत छोटे छोटे विद्यार्थी हे होते. यावेळी विद्यार्थांनी महात्मा गांधी, झाशीची राणी, सानिया मिर्जा, पंडित जवाहरलाल नेहरू, किरण बेदी, सिंधुताई सपकाळ, लता मंगेशकर ह्या वेशभूषेत शाळेतील विद्यार्थी तयार झाले होते.
या सर्व विद्यार्थांनी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली पालकांनी सुद्धा प्रभात फेरीचा आनंद घेतला या सर्व उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या हलमारे आणि शाळेचे सर्व शिक्षकांनी प्रयत्न केला आणि कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला.