देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- श्री क्षेत्र तेलगाव मारुती देवस्थान मांडोघोराड येथे रथसप्तमी निमित्त श्री भागवत उजळणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. सदर कार्यक्रम श्री साई भागवत समिती तर्फे श्री भागवत उजळणी कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री भागवत शिव महापुराण उद्यापन (उजळणी) कार्यक्रम आयोजित केला होता व कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून डॉ. ह.भं .प. रामकृष्ण महाराज यांनी आपली उपस्थिती दर्शवली व डॉ. रामकृष्ण महाराज यांना समिती तर्फे श्री भागवत शिव महापुरणाचे काही बोलकी दृश्य छायाचित्रे म्हणून भेट देण्यात आली.
यावेळी श्री साई भागवत समितीचे अध्यक्ष प्रकाश लारोकर, कोषाध्यक्ष लखन ठाकरे, सचिव भीमन्ना बैरी, अविनाश शिंदे, सुनील झाडे, संजय ठाकरे, संजय भडांगे, गणेश विश्वकर्मा, योगराज सोहलीया, भानू तराळे,पराग वानखेडे, गुड्डू कटरे, विजय जिचकार,अशोक गर्ग, आयुष सोहलीया, जयेश लारोकर, पुरब ठाकरे समितीचा महिला, मुलं, मुली व परिसरातील असंख्य नागरिक यांनी आपली कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.