✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात मागील काही दिवसांपूर्वी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून वातावरण तापलं होतं. असे असताना भाजप नेत्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका मात्र थांबताना दिसत नाहीयेत. आता पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विधानावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
पुण्यात बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अजब विधान केलं आहे. चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी करण्यात आली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे, असे विधान चित्रा वाघ यांनी केलं आहे. पुण्यातील हेमंत रासने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात चित्रा वाघ बोलत होत्या. दरम्यान चित्रा वाघ यांच्या विधानामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.