नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- 27 जानेवारी 2023, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे भारतीय जनता पार्टी चे सन्माननीय ज्यांना अनाथांचे आमदार म्हणुन ओळखले जाते असे विधान परिषदचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या ‘तर्पण’ ही संस्था तरुण अनाथांचे भविष्य घडवून त्यांना राष्ट्र हितासाठी प्रेरित करण्याचे सद्कर्म करते. आज संस्थेच्या ‘सिंहावलोकन’ कार्यक्रमात श्रीकांत भारतीय यांचे ज्वलंत प्रेरनादायी विचार मांडले. यावेळी त्यांना भाजपा जिल्हाध्यक्ष श्री रवि व्यास जी यांनी सुद्धा सुंदर साथ दिली.
या प्रसंगी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चे वरिष्ठ श्री जयंत कुलकर्णी यांचे विद्यार्थी आणि पालकां मधील संबंध जपण्यासाठी असलेला दूर दृष्टीकोन, आणि बोलताना त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व ऐकून मराठी आपली मायबोली असल्याचा अभिमान द्विगुणित झाला. असे यावेळी नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि एकूणच जेव्हा केव्हा आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे जाऊन अशा कार्यक्रम मध्ये सहभागी होतो, तेव्हा आपण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा सार्थ अभिमान वाटतो.