संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांकरिता टॅलेंट शो चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी गीत, संगीत, नृत्य वेशभूषा, कराटे, भुमिका अभिनय अशा विविध कलाविष्काराचे सादरीकरण केले.
या प्रसंगी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक रफिक अन्सारी, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गीतांजली गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन जया ढवस यांनी केले.

