Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

महापालिकेच्या माता बाल केंद्रामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची पूर्ण वेळ उपस्थिती अनिवार्य: आयुक्त अभिजीत बांगर

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 2, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
महापालिकेच्या माता बाल केंद्रामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची पूर्ण वेळ उपस्थिती अनिवार्य: आयुक्त अभिजीत बांगर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे :-महानगरपालिकेच्या सर्व माता बाल रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया विभाग (ऑपरेशन थिएटर) कार्यान्वित करणे गरजेचे आहे या सोबतच सर्व ठिकाणी फक्त इलेक्टिव्ह सिझेरियन नव्हे तर तर इमर्जन्सी सिझेरियनची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देत असतानाच माता बाल केंद्रामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची पूर्ण वेळ उपस्थिती अनिवार्य असलीच पाहिजे, यासाठी अतिरिक्त स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञांची आवश्यकता असेल तर ते उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर आरोग्यकेंद्र व मीनाताई ठाकरे प्रसुतीगृहाची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी (३१ जानेवारी २०२३) केली. आरोग्य केंद्रात स्त्रीरोगतज्ज्ञ व इतर डॉक्टरांची अनुपस्थिती, आरोग्यकेंद्राची दुरावस्था, आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आदी बाबी दिसून येताच याबाबत संबंधितांना जाब विचारत ठाणे महापालिकेच्या सर्व विभागातील आरोग्यकेंद्रात सेवेत असलेल्या निवासी डॉक्टरांना पूर्णवेळ कार्यरत राहण्याचे निर्देश दिलेत. सर्व ठिकाणी रुग्णांना वेळेवर व नियमित उपचार मिळतील या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात गरीब व आर्थिक घटकातील नागरिकांना वेळेवर व मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विभागनिहाय आरोग्यकेंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. यापैकी शिवाजीनगर आरोग्य केंद्राची पाहणी आयुक्तांनी आज दुपारी एक वाजता केली. यावेळी दैनंदिन सेवेत असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ दुपारी बारा वाजता दुसऱ्या आरोग्य केंद्रात गेल्याची बाब निदर्शनास आली. प्रसुतीगृहामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ पूर्ण वेळ उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे नमूद करीत यासाठी संपूर्ण नियोजन करुन प्रसुतीगृहामध्ये व आरोग्यकेंद्रात डॉक्टरांची उपस्थिती पूर्णवेळ राहील यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

यावेळी संपूर्ण आरोग्य केंद्रातील सोनोग्राफी कक्ष, शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करीत असताना लॉबीमध्ये वापरात नसलेले बेडस् व इतर साहित्य तातडीने हटवून लॉबी तात्काळ मोकळी करण्यात यावी. तसेच सद्यस्थितीत आरोग्‌यकेंद्रातील ओपीडी ही पहिल्या मजल्यावर असून ती तळमजल्यावर करणेबाबत कार्यवाही करावी जेणेकरुन गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीस्कर होईल असेही त्यांनी नमूद केले. प्रसुतीगृहात नावनोंदणीसाठी येणाऱ्या गरोगर मातांची नोंदणी आठवड्यातून एक दिवस न करता दररोज सुरू राहील या दृष्टीने नियोजन करावे.

महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्र पूर्णवेळ चालू राहतील या दृष्टीने नियोजन करावे व या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सेवा जसे सोनोग्राफी सेंटर, आवश्यकतेप्रमाणे निवासी डॉक्टर्स, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच वैद्यकीय कर्मचारी यांची तातडीने पूर्तता करावी व नागरिकांचा विश्वास संपादन होईल या दृष्टीने रुग्णांना सेवा देण्याचे काम सातत्याने सुरू राहील याबाबत दक्ष राहून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आयुक्त बांगर यांनी दिले.

संपूर्ण आरोग्य केंद्रातील आवश्यक स्थापत्य कामे करुन उपलब्ध कक्ष नीटनेटके व स्वच्छ राहतील यासाठी देखील योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालयातील गळती काढणे, प्लास्टर, विद्युतीकरण आदी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधितांना यावेळी बांगर यांनी दिले.

शहर सौंदर्यीकरणाचा घेतला आयुक्तांनी आढावा..

शहरात सुरू असलेली सौंदर्यीकरणाची कामे ही अंतिम टप्प्यात असून या कामाचा आढावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी आज घेतला. शहरातील पादचारी पूल, सेवा रस्त्यालगत असलेली उद्याने, उड्डाणपुलाखालील दोन गर्डरमधील मोकळ्या जागेत विद्युत रोषणाई आदी उर्वरित कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान दिले. आनंदनगर येथील ठाण्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस दगडी दीपमाळा तयार करण्याचे काम सुरू आहे. या दीपमाळाचे उर्वरित काम व दीपमाळांना विद्युत रोषणाई करुन सदरचे काम हे १५ एप्रिलपर्यत पूर्ण करण्याच्या सूचना बांगर यांनी यावेळी दिल्या. आकर्षक रंगसंगतीने आनंदनगर येथील फूटपाथ तयार केले असून रेलिंगलाही आकर्षक रंग देण्यात यावा जेणेकरुन या परिसराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल या दृष्टीने काम लवकरात लवकर करण्यात यावे असेही त्यांनी नमूद केले.

डेब्रीज हटविण्यासाठी विशेष पथके तयार करावीत..

शहरातील रस्त्यांच्या कडेला ज्या-ज्या ठिकाणी डेब्रीज नजरेस पडेल ते तातडीने उचलले जावे यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या स्तरावर विशेष पथके तयार करुन त्या पथकाच्या माध्यमातून सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत दोन शिफ्टमध्ये शहरभर गाड्या फिरत राहतील व डेब्रीज उचलले जाईल याचे नियोजन सुनिश्चित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

हरितपट्टयामधील झाडांची लागवड घनदाट पध्दतीने करावी..

रस्त्याशेजारी विकसित करण्यात आलेल्या ट्री बेल्टमध्ये लागवड केलेली झाडे ही आकर्षक व सुशोभित वाटत नसल्याने सदर हरित पट्टा विकसित करताना विविध सुशोभित झाडांची दाट स्वरुपात लागवड केलेली असावी, तसेच त्याची निगा व देखभाल उच्चप्रतीची ठेवण्याबाबतच्या सूचनाही बांगर यांनी यावेळी दिल्या.

Previous Post

उद्योगांना मिळणाऱ्या सर्वतोपरी सहकार्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे आवडते ठिकाण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या १२५ एनसीसी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मान.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या १२५ एनसीसी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मान.

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या १२५ एनसीसी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In