✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मो.८६५७३४५९१६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा काल निकाल समोर आला. त्यात भाजप, शिवसेना, रिपाइं, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवडून येत शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव करत इतिहास रचला. या विजयामुळे पनवेल भाजपच्यावतीने रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोष करण्यात आला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, शहर सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, राजू सोनी, माजी नगरसेविका सुशीला घरत, नीता माळी, राजेश्री वावेकर, रुचिता लोंढे, वृषाली वाघमारे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के. सी. पाटील गुरुजी, संजय भगत, मधुकर उरणकर, मुनावर पटेल, अमरीश मोकल, अभिषेक पटवर्धन, वासुदेव पाटील, हारुशेठ कोळी,रोहित जगताप, प्रसाद हनुमंते, अभिषेक भोपी, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, प्रीतम म्हात्रे, विशाल म्हसकर, रुपेश नागवेकर, प्रवीण मोहोकर, भीमराव पोवार, , यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते. पेढे भरवून तसेच बॅण्ड आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आले. यावेळी भारत माता कि जय, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, आमदार प्रशांत ठाकूर आगे बढो हं तुम्हारे साथ है, या घोषणांनी गगनभेदी जयघोष करत किमयागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मेहनतीचा गौरव केला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

