नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त यांनी महानगरपालिका आर्थिक सुधारणा म्हणजेच (महानगरपालिका उत्पन्न वाढ व खर्चात बचत) प्रशासकीय समितीची केली स्थापना करण्यात आली. मिरा भाईंदर महानगरपालिकेची आर्थिक सुधारणा करणेकामी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी सदर समिती गठित केली.
सदर समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर असून सहअध्यक्ष अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे आहेत. सदर समितीचे सदस्य सचिव उपायुक्त (मालमत्ता कर) असून, समितीचे सदस्य उपायुक्त (मुख्यालय/अग्निशमन), उपायुक्त (घ.क.व्य.), उपायुक्त (जाहिरात व बाजार), शहर अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता, सहाय्यक संचालक नगररचना, मुख्यलेखा अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, परिवहन उपव्यवस्थापक असणार आहेत. 15व्या वित्त आयोगाचा निधी मिळण्यासाठी महापालिकेच्या उत्पन्नात 25% वाढ होणे बंधनकारक आहे असे पत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. त्यानुसार महापालिकेच्या उत्पन्नात कशाप्रकारे वाढ करता येईल व महापालिकेच्या खर्चात कशाप्रकारे बचत करता येईल यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी पुढील 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 03 फेब्रुवारी रोजी आर्थिक सुधारणा प्रशासकीय समिती (महानगरपालिका उत्पन्न वाढ व खर्चात बचत) समितीचे अध्यक्ष ,सहअध्यक्ष यांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांची पहिली बैठक पार पडली.

