पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
अंमली पदार्थ विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे शहर
पुणेे – : रेल्वे स्टेशन येथील रेल्वे मेल सर्व्हिस (RMS) मध्ये नोकरी लावतो असे खोटे अमिष दाखवुन त्यापोटी १०,८१,०००/- रूपये ऑनलाईन गुगल पे अकॉउंट व रोखीने स्विकारुन पुणे रेलवे स्टेशन येथील रेल्वे मेल सर्व्हिस (RMS) सेक्शन या ठिकाणचे नोकरीचे बनावट स्वाक्षरीचे व भारतीय रेलची मुद्रा असलेले बनावट जॉइनिंग लेटर देवुन फसवणुक करणा-या टोळीबद्दलची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक १ कड़ील पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती त्याबाबत सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांना योग्य ती कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे यांनी फसवणुक झालेले इसम यांची फिर्याद घेवुन बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे तिन इसमांविरुध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३/२०२३ भा.द.वि.क. ४२०, ४६५,४६८, ४७५, ३४ प्रमाणे दि.०२/०२/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे करीत असताना पोलीस अंमलदार पांडुरंग पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बडगार्डन पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३ / २०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४६५,४६८, ४७१.३४ मधील आरोपी नामे योगेश संतराम माने व निलेश संतराम माने दोघे रा. ताडीवाला रोड पुणे हे त्यांचेकडील दुचाकी वाहनावरुन पुणे रेल्वे स्टेशन पार्सल गेट समोर येणार असल्याची माहिती मिळाली.
सदर ठिकाणी सापळा रचुन इसम नामे योगेश संतराम माने व निलेश संतराम माने दोघे रा. ताडीवाला रोड, पुणे यांना त्यांचे ताब्यातील दुचाकीसह ताब्यात घेतले असता त्यांचे झडतीमध्ये ०८ खाकी रंगाचे कागदी लिफाफे प्रत्येक लिफाफयामध्ये सेंन्ट्रल रेल्वेचे बनावट नियुक्ती पत्र ०४ बँकचे चेक बुक, ०५ बँक पासबुक, ०३ कोरे लिफाफे १० सेंन्ट्रल रेल्वेचे बनावट नियुक्ती पत्रे दोन मोबाईल, ०५ प्लॅस्टिकचे आयकार्डचे कवर, ०२ रेल्वेचे बनावट आयकार्ड ०५ स्टिलचे हुक असलेले निळया रंगाच्या लेस (बनावट आयकार्ड तयार करण्यासाठी), रोख रक्कम असा एकुण ९९,५००/- रुपये किंमतीचा ऐवज मिळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आले आहे. पुढील अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक वाघमारे हे करीत आहे..
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त गुन्हें १ श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शना खाली अंगली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील श्री. विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंगलदार सुजित वाडेकर पांडुरंग पवार प्रविण उत्तेकर, मनोजकुमार साळुंके मारुती पारधी “विशाल दळवी, संदिप शिर्के, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.

