पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर
पुणे :– दिनांक ०२/०२/२०२३ रोजी सिंहगड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात नवले बिज समोरील डेक्कन पव्हेलियन हॉटेल येथील रुप टॉपवर ऍसे हॉटेलमध्ये अवैध हुक्का पार्लर चालु आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी जावुन छापा कारवाई केली असता ऍसे हॉटेल टेरेसवर नवले ब्रिज जवळ न हे पुणे या हॉटेलमध्ये आरोपी १) मयुर प्रकाश माने वय २७ वर्षे रा. सदाशिव दांगट नगर साईव्दारका बि. फ्लॅट नं. १०२ वडगाव पुणे २) प्रणित संजय पोटपिटे वय २३ वर्षे रा. दांगट पाटीलनगर शिवणे पुणे ३) आदर्श अशोक गज्जर वय ३० वर्षे रा. एन. डी. ए. रोड संजीवनी हॉस्पीटलजवळ उत्तमनगर पुणे यांचे उपस्थितीत त्या ठिकाणी ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या तंबाखुजन्य हुक्का पदार्थ पुरवुन त्या ठिकाणी हुक्काबार चालविताना तसेच ६८,०००/- रुपये चे अलफकर, रॉयल स्मोक इन, अफजल, अलअयान, या नावाचे तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर १२ काचेचे हुक्का पॉट १२ चिलीम सह त्यास १२ हुक्का पाईप जोडलेले, व त्यास लागणारे साहित्य त्यांचे कब्जात बाळगताना आढळुन आल्याने त्यांचे विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं. ७९ / २०२३, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४ अ, २१- अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, संदिप शिर्के, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.