अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतूषार वारे यांनी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या निवेदनाची दखल घेत मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ विजय वाडेकर यांची तडकाफडकी बदली केली.
मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ विजय वाडेकर यांची बदली होऊन जवळपास ८ दिवस झाले परंतु मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात रीक्त असलेल्या जागेवर अजुन पर्यंत कोणत्याही डॉक्टरला रुजु करण्यात आले नाही. तसेच बऱ्याच दिवसांपासून आलेगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार एकाच डॉक्टर वर आहे म्हणून आलेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र व मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकरणी आज दिं ६ फेब्रुवारी रोजी उमेश सुरेशराव इंगळे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात यावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली. सदर मागणी मान्य न झाल्यास मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना घेऊन उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडेल अशी मागणी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348