पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०४.०२.२०२३ रोजी गणेशपेठ, मच्छीमार्केट, पुणे येथील परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अगंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीर मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने १० इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून मटका जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण ३२,०६०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम १० इसमांविरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुरनं २९/२०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता फरासखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत बाबा कर्पे, तुषार भिवरकर इरफान पठाण, इम्रान नदाफ, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

