पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन पुणे :- आज रोजी Unit-2 हद्दीत API वैशाली भोसले, पोलीस हवालदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, नामदेव रेणुसे, उत्तम तारू,असे पेट्रोलिंग करीत असताना धाबाडी कात्रज येथे आलो असता, *पो हवा नामदेव रेणुसे, उत्तम तारू ,* यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सिहंगड रोड येथे एक इसम संशयितरित्या थांबला असून त्यांचेकडे रि्व्हॉल्वर आहे, अशी खात्रीलायक बातमी मिळताच *युनिट 2 चे प्रभारी मा क्रांतिकुमार पाटील सो* याना अवगत करता त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वरील स्टाफने तात्काळ बातमी ठिकाणी धाव घेत सदर इसमास जागीच पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता, त्याने आपले नाव अजय विष्णू थोपटें वय 19 रा जनता वसाहत गल्ली न 71 पार्वती पुणे* असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचे पँटच्या आत कंबरेला कीं रु *40,000/- चे एक लोखंडी रि्व्हॉल्वर* मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले असून त्याचे विरुद्ध *सिहंगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. /२०२३ आर्म ऍक्ट 3(२५) मपो अधि ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे** गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रमाणे कारवाई करण्यात आली असून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कायदेशीर कार्यवाहीकामी *सिहंगड पो स्टे * च्या ताब्यात देण्यात आले आहे .
त्याच्याविरुद्ध यापूर्वी IPC 307 चा गुन्हा दाखल आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे सो, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री.सुनील पवार सो. Unit-2 प्रभारी वपोनि श्री. क्रांतीकुमार पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे संजय जाधव , उज्वल मोकाशी ,शंकर नेवसे , उत्तम तारू, , नागनाथ राख या पथकाने केली आहे. आदरपूर्वक सादर,

