उषा कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ विहार सांगली येथे माता रमाई यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात तथागत बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई याच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्रमुख वक्ते राजकुमार पेंडणेकर यांनी माता रमाई आणि आजची स्त्री या विषयावर मार्गदर्शन करताना रमाई चा त्याग, त्यांनी बाबासाहेबांना केलेली मदत, समाजासाठी केलेली मदत यातून रमाई समजून सांगितली. त्यानंतर दरमहिन्याला आपल्या उत्पन्नातून दान देणाऱ्या अमोल कांबळे, अमिता खंडागळे, अक्षय गायकवाड याचे पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
यानंतर सी आर सांगलीकर फौंडेशन सांगली येथे मुर्तीदान समितीमध्ये विहाराचे उपासक अरुण कांबळे सर व चळवळीतील कार्यकर्ते आंनदराव कांबळे सर याचे अभिनंदन करण्यात आले.
त्यानंतर लहान मुलींनी माता रमाई यांच्या जीवनावर विविध फैलू आपल्या भाषणातून माडल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंतिका वाघमारे यांनी केले. पाहुण्याची ओळख दिपाली कांबळे यांनी, प्रस्तावना संभाजी माने यांनी व कार्यक्रमाचे आभार शैलजा साबळे यांनी केले.
यावेळी विहाराचे अध्यक्ष सुधीर कोलप, उपाध्यक्ष, सुनीता पारमित धम्मकीर्ती, सचिव, पवन वाघमारे, सहसचिव भारत कदम, खजिनदार संभाजी माने, सहखजिनदार जग्गनाथ आठवले, संचालक उषाताई कांबळे, संजय घाडगे, चंद्रकांत चौधरी, अवंतिका वाघमारे, शैलजा साबळे, दीपमाला कांबळे तसेच विहाराचे उपासक अरुण कांबळे, पारमित धम्मकीर्ती, संजीव साबळे, चंद्रकांत नागवंशी, दीपक कांबळे, सर्जेराव नरवाडे, गंगाधर दांडे, सूरज कांबळे, विजय लांडगे, विकास भिसे, किरण भिसे, विश्वास मागाडे, प्रकाश शिवशरण, बाळासाहेब शिंदे, हर्षद दादा, अमोल कांबळे, अक्षय गायकवाड, स्वातीमित्रा कांबळे, अमिता खंडागळे, मालन शिरगुपीकर, धेडे मावशी, चेतना नागवंशी, रुचिता वाघमारे, कोमल भिसे, मनीषा जमणे, प्रमिला मागाडे, प्रियांका कांबळे व इतर अनेक उपासक उपासिका उपस्तिथ होत्या. यावेळी हा कार्यक्रम संपन्न होणेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे विहारामार्फत आभार
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348