✒️प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- आंबेडकरी चळवळीचा आंदोलनाचा वृत्तपत्राचा माध्यमातून आवाज बुलंद करणाऱ्या दैनिक वृत्तरत्न सम्राट चे संपादक बबन कांबळे यांचे बुधवार दिनांक 08 फेब्रुवारी ला सकाळी 7.00 वाजताच्या सुमारास दीर्घ आजारामुळे लाईफ लाईन हाॅस्पिटल, ठाणे येथे निधन झालं आहे. बबन कांबळे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळ आणि आंदोलनाचा एक शिल्लेदाराचा अंत झाला. पण त्यांनी चराचरात पेरलेली पत्रकारिता अनेक पत्रकारासाठी ही दीपस्तंभाचे कार्य करेल.
बबन कांबळे यांनी सुरू केलेले दैनिक वृत्तरत्न सम्राट ने एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकच झंझावात निर्माण केला होता, हे वृत्तपत्र अन्याय अत्याचारावर प्रखर प्रहार करत होते. शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी मानवतावादी चळवळ आपल्या दैनिक वृत्तरत्न सम्राट च्या माध्यमातून बबन कांबळे यांनी माडल्या. दैनिक वृत्तरत्न सम्राट मध्ये छापून आलेल्या बातमीमुळे शासन प्रशासन पातळीवर हादरे बसत असायचे, दैनिक वृत्तरत्न सम्राट मधिल लेख समाजामन ढवळून काढायचे. अनेक मुक्याचे प्रश्न वृत्तपत्र सम्राट ने मांडले ते माडलेच नाही तर त्यांना न्याय मिळवून दिला.
दैनिक वृत्तरत्न सम्राट ने महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी चळवळीला एक हक्काचं माध्यम निर्माण झालं होतं. वाचक वर्ग वृत्तपत्र कधी येणार याची वाट बघत असायचे. उद्याचा अंकात काय छापून येणार याची घारी सारखी वाट बघत असायचे. सम्राट ने आंबेडकरी चळवळीत नवा जोश भरण्याचे कार्य केल.
दैनीक वृत्तपत्र सम्राटने महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी चळवळतील अनेक बुद्धिजीवी, प्रबोधनकार, कवी लेखक नामवंत विचारवंत यांनी दैनिक सम्राट च्या माध्यमातून आपले विचार रोखठोकपणे समाजापुढे मांडले. अनेक लेखमाला बबन कांबळे यांनी चालविल्या होत्या. त्याकाळातील तरुणाना एक वैचारिक खाद्य पुरविण्याचे काम दैनिक वृत्तरत्न सम्राट ने केलेलं आहे.
दैनिक सम्राट चळवळीचे हे वृत्तपत्र सर्व बहुजन समाजाला न्याय मिळवून देणारे माध्यम व्हावे आणि ते चालावं म्हणून समाजातील अनेक गोरगरीब लोकानी त्याकाळी आपल्या गाठीला असणारा पैसा अडका दागदागिने सुद्धा दैनिक वृत्तपत्र सम्राट ला दिलेले होते. त्यामुळे लोकाना सम्राट प्रती कोणत्या प्रकारची भावना होती, हे यातून स्पष्ट होते.