उषा कांबले, सांगली शहर प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- तालुक्यातील सुकळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धांगिनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीचा कार्यक्रम मेहकरमध्ये आयोजित करण्यात आला असता त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मुख्य कार्यकारी सचिव मा.अनिल देबाजे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.आपल्या छोट्या खानी भाषणामध्ये सांगितले त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले..
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मुख्य कार्यकारी सचिव अनिल देबाजे म्हणाले माता रमाई यांनी शेणाच्या गौवर्या थापून त्या विकून घर संसार चालवला व उरलेले पैसे बाबासाहेबांना शिक्षणासाठी पाठवले. अतिशय बिकट परिस्थितीत बाबासाहेबांच्या पाठीमागे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. माता रमाईच्या त्यागामुळेच बाबासाहेब घडू शकले. माता रमाई नसत्या तर बाबासाहेब आंबेडकर मोठे होऊ शकले नसते. असे प्रतिपादन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मुख्य कार्यकारी सचिव अनिल देबाजे यांनी केले.
यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मुख्य कार्यकारी सचिव अनिल देबाजे, रामेश्वर झरे, गजानन मोरे, भीमराव शेटाने, रहीम शाहा, तुकाराम तुरुकमाने, राजू तुरुकमाने, सिद्धार्थ मोरे, हर्षल मोरे, उमेश मोरे, चेतन देबाजे, विलास पवार, अर्चनाबाई मोरे, मालताबाई अंभोरे, रामाबाई अंभोरे आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे समस्त पदाधिकारी सदस्य व महिला आघाडी व गावकरी मंडळी उपस्थित होते.