✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यात नागरिकांमध्ये दहशत पसरविणे तसेच त्यांच्या मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या दहा सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पाेलिसांच्या प्रस्तावावर उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी अखेर मोहर उमटवली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सर्वच पोलिस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सराईत गुन्हेगारांबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या
पार्श्वभूमीवर मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे, दहशत निर्माण करणे, जिवाने मारण्याची धमकी देणे, खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग आदी विविध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची शोध मोहीम राबविण्यात आली. त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ)(ब) अन्वये ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पासून काही जणांना २ वर्ष तसेच काही जणांना १ वर्षांसाठी वर्धा जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहे.
उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी तसे आदेशही पारित केले आहे पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल सुरेश इखार, रा. रुख्मिणी नगर,सिंदी (मेघे), याला २ वर्षांसाठी, दीपक उर्फ काल्या नथ्थु गजभिये रा. हिंदनगर, थुल ले आऊट, वर्धा याला २ वर्षांसाठी, बादल रामदास कल्याणी, रा. गिट्टीफल, सावंगी (मेघे), याला १ वर्षांसाठी, संकेत सुनिल डंभारे, रा. तथागत बौध्द विहार जवळ, सिदी (मेघे) याला २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
याबराेबरच समिर खान सलीम खान, रा. वर्धा २ वर्षांसाठी, सुनिल उकंडराव पचारे, रा. पडेगाव, याला १ वर्षांकरीता, सुभाष वामन सातघरे, रा. पवनार याला १ वर्षासाठी, सुमित उर्फ लारा चंद्रभान माटे, रा. जुनी वस्ती, सेवाग्राम याला २ वर्षासाठी, मंगेश तेजराम राणा, रा. दहेगाव, याला १ वर्षासाठी, ऋषीकेश उर्फ गुड्डू लोखंडे, रा, रामनगर याला एक वर्षासाठी अशा दहा गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.