नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वसई विरार:- वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटन जलशुद्धीकरण केंद्र ह्या ठिकाणी दिनांक 10 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी 09:00 ते संध्याकाळी 06:00 असा 9 तास महाराष्ट्र राज्य वीज महावितरण (MSEB) चे तांत्रिक दुरुस्ती साठी शट डाउन असल्याने ह्या वेळेत विद्युत सप्लाय खंडित राहणार आहे,
त्या दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लागत सूर्या योजनेच्या जुन्या वहिनी वरील भालीवली, खाणीवडे गावाजवळील असे दोन (2) लिकेज आणि नवीन योजनेवरील काशिदकोपर गावा जवळील येथील एक (1) लिकेज दुरुस्ती चे काम महापालिके मार्फत करण्यात येणार असल्याने ह्या दुरुस्ती साठी सकाळी 09:00 ते अंदाजे पुढील 12/14 तास लागणार असल्याने दिनांक 10 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी 09:00 ते अंदाजे पुढील 12/14 तास वसई विरार शहर महापालिकेतील सूर्या धरणाचा पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद राहणार असून महाराष्ट्र राज्य वीज महावितरण (MSEB) चा विद्युत सप्लाय पूर्ववत झाल्या नंतर आणि लिकेज दुरुस्ती चे काम पूर्ण झाल्यावर शहरातील पाणी पुरवठा टप्याटप्याने चालू करण्यात येईल, त्या नंतर ही दिनांक 11 फेब्रुवारी शनिवार रोजी शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित आणि कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे ह्याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती पाणी पुरवठा विभाग वसई विरार शहर महानगर पालिका.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348