देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका, जिल्हा नागपूर.
हिंगणा:- तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळा महाविद्यालयाची दारे उघडे करून देणारे व सुधारकांचा वारसा चालविणारे शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉ. सुधाकर मोगलवार हे थोर समाजसेवक होते, असे प्रतिपादन पोलीस उपयुक्त गजानन राजमाने यांनी केले. बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित संत गाडगे महाराज महाविद्यालयात स्व. डॉ. सुधाकर मोगलेवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव उदय मोगलवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहपोलीस उपायुक्त अशोक बागुल, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, ठाणेदार विशाल काळे, नगराध्यक्ष लता गौतम पारधी, उद्योजिका मालीनी सांघी, उद्योजक बाळासाहेब कांबळे, प्राचार्य डॉ. आरती मोगलेवार, एड. अक्षय मोगलवार, उपप्राचार्य डॉ. गणेश मायवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आरती मोगलेवार यांनी केले. माजी विद्यार्थी मंगेश भांगे व लता पारधी यांनी कलाक्षेत्रात शिकलेल्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्रात या महाविद्यालयाने घडविले असे उद्गार काढले. तर उद्घाटनपर भाषणात माजी मंत्री सुनील केदार यांनी गुरुमुळे विद्यार्थी घडत असतात, घडलेले विद्यार्थी आभाळाला हात लावू शकतात आणि असे आभाळाला हात लावणारे विद्यार्थी या महाविद्यालयाने घडविले, असे गौरवोद्गार काढले. सह पोलीस उपायुक्त अशोक बागुल यांनीही विद्यार्थ्यांना खुमासदार शैलीत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. यावेळी स्व. मोगलेवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वादविवादात स्पर्धा, निबंध स्पर्धा, समयसूचक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी आणि क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याशिवाय हिंगणा तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शन सचिव उदय मोगलवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रितेश कोळे यांनी केले तर ॲड. अक्षय मोगलवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गणेश चव्हाण, डॉ. संजय तुपे, डॉ. वामन खोब्रागडे, डॉ. अलका झाडे, डॉ. संजय ढोक, डॉ. अनिल बर्वे, प्रा. धनंजय मेंढुले, डॉ. सुषमा बागेश्वर, डॉ. साईनाथ वाघमारे, डॉ. राजदीप उताणे, डॉ. रूपाली चौधरी, डॉ. रजनी सेलोटे, डॉ. माधुरी भोंडे, डॉ. माधुरी ठाकरे, मुख्याध्यापक प्रेमदास उरकुडकर, प्रा. धनंजय डोरले, प्रा. विभाग नगरे, प्रा.शीला उमरेडकर, प्रा. अनिल चानकापुरे, प्रा. मनोज ठाकूर, डॉ. संजय बर्वे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.