पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भारत सरकार अर्थ मंत्रालय महसुल विभाग, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार तसेच महाराष्ट्र शासन गृहविभाग (विशेष) यांचेकडील अधिसुचना व त्यातील तरतुदीनुसार व मा. अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रकानुसार पोलीस आयुक्त, पुणे शहर कार्यक्षेत्रातील १६ पोलीस ठाणे मध्ये जप्त करण्यात आलेले खालील नमुद अंमली पदार्थ राजंणगांव येथील एमईपीएल कंपनीचे भट्टी मध्ये दिनांक ०८/०२/२०२३ रोजी संपुर्ण कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून नाश करण्यात आले आहेत.
१) गांजा ७५६ किलो ७८२ ग्रॅम कि रु अं १,५१,३५,६४०/- २) कोकेन ३९० ग्रॅम ७६ मिलीग्रॅम कि रु ७८,१५,२००/-
३) एम.डी. १४० ग्रॅम ७१ मिलीग्रॅम कि रु २१,१०,६५०/-
४) चरस ०२ किलो ९६५ ग्रॅम कि रु २९,६५,०००/- ५) हेरॉईन ०१ किलो २९८ ग्रॅम कि रु १२,९८,००००/-
असे एकुण ७६१ किलो ५७५ ग्रॅम १४७ मिलीग्रॅम वजनाचे सुमारे ४,१०,०६,४९०/- रुपये किंमतीचे अंमली पदार्थ मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या कमिटीच्या देखरेखेखाली हे अंमली पदार्थ नाश करण्यात आले आहेत.
१) श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हें पुणे शहर (कमिटी अध्यक्ष )
२) श्री. अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर (कमिटी सदस्य )
३) श्री. रोहिदास पवार, पोलीस उप आयुक्त, मुख्याल, पुणे शहर (कमिटी सदस्य ) तसेच अंमली पदार्थ नाश प्रक्रियेत शासनाचे इतर विभागचे खालील अधिकारी सुध्दा उपस्थितीत होते.
१) श्री. दत्तात्रय द. गवळी, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ पुणे
२) श्री. संदिप रघुनाथ पाटील, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ पुणे
३) डॉ. उल्का कृ. कुलकर्णी, सहा. रासायनिक विश्लेषक प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळा. पुणे
४) समीर एल. पाटील, निरीक्षक भरारी पथक ५ राज्य उत्पादन शुल्क पुणे
५) विठ्ठल बी. बोबडे, निरीक्षक भरारी पथक १ राज्य उत्पादन शुल्क पुणे
सदरची कार्यवाही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे. श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे. श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ व ०२ गुन्हे शाखा, पुणे, श्री. विनायक गायकवाड व श्री. सुनिल थोपटे तसेच त्यांचेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी विशेष मेहनत घेतली आहे.