पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सय्यदनगर भागात फायरिंग करुन एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे अतिक इक्बाल शेख (वय ३७) सय्यदनगर, हडपसर व सादीक साहील शेख (वय २५) श्रावस्तीनगर, घोरपडी गाव यांना देहूरोड येथून ताब्यात घेवुन देशी बनावटीची पिस्टल व आठ राउंड, मोबाईल हॅन्डसेट आणि गुन्हा करुन पळुन जाण्यासाठी वापरलेली बर्गमन मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे.
यातील अतिक इक्बाल शेख हा पुणे शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी त्याचेवर खुन, मारामारी, दंगा, खुनाचा प्रयत्न अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याच्यावर यापूर्वी खून मारामारी, दंगा , खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सय्यदनगर भागात गोळीबार करुन एकला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याची प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवरआयपीसी307,504,506(2),120(ब),212,115, आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. देहूरोड पोलिसांच्या मदतीने वानवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपये किमतीची देशी बनवाटीची पिस्टल, 2 हजार 400 रुपयांचे आठ जिवंत राऊंड, 7 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, एक लाख रुपये किमतीची मोपेड गाडी असा एकूण 1 लाख 49 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
सदरची कारवाई वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले, तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले, पो.अंम. अजय केसरकर, अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, संतोष काळे, महेश गाढवे, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, विष्णु सुतार, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले व मनिषा सुतार यांनी केली.