श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- शहरातील पेठ बीड भागातील आठवडी बाजारात जाऊन डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी बाजार परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि व्यापारी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
शहरातील पेठ बीड भागात जुनी बाजार पेठ आहे. येथे अनेक वर्षांपासून दर रविवारी आठवडी बाजार भरतो. याठिकाणी शहराच्या शेजारील १० ते १२ खेड्यातील शेतकरी आपला भाजीपाला घेऊन विक्री करण्यासाठी येत असतात. परंतु या ठिकाणी बसण्यासाठी असलेल्या जागेवर खूप मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे शेतकरी या ठिकाणी न बसता मुख्य रस्त्यावरच बसत असल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. शिवाय रस्त्यावर बसल्यामुळे भाजी विक्रेत्यांच्या जीवितास धोका देखील निर्माण झाला आहे.
याच संदर्भात युवा नेते डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांनी बाजारपेठेत जाऊन शेतकरी आणि व्यापारी बांधवांशी चर्चा केली. यावेळी व्यापारी, बाजार घटकांनी आणि शेतकऱ्यांनी बाजारातील समस्या मांडत सदर बाजारातील घाणीचे साम्राज्य तात्काळ दुर करण्याची मागणी डॉ.योगेश भैय्या क्षीरसागरांकडे केली. यावेळी डॉ. योगेश भैय्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व त्यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी आणि पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले. व पुढील रविवारी भाजीपाला विक्रेते हे रस्त्यावर न बसता बाजार परिसरातच बसतील यासाठी यादृष्टीने स्वच्छतेचे कामे करण्यात येईल असे सांगितले.
याप्रसंगी त्यांनी बाजार परिसरातील स्वच्छते संदर्भात बीड नगर पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देखील केल्या. यावेळी नगरसेवक ॲड.विकास जोगदंड, राणा चौहाण, राहुल शिंदे, आदित्य पवार, ॲड. नागेश तांबारे, महादेव वाघमारे, सौ. संगीताताई वाघमारे, सौ. शारदाताई डुलगज, बंडू निसर्गन, भागवत बादाडे, सतपाल लाहोट, फामजी पारीख, विशाल मोरे, अमोल गलधर, अमर विद्यागर, अंकुर गायकवाड, माजेद कुरेशी, ज्ञानेश्वर राऊत, इम्रान पठाण, रवी बन, सूरज कु-हे यांच्यासह शेतकरी, व्यापारी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348