Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाने केला जबरी चोरीचा पर्दाफाश..“सासूला मारहाण करण्यास सांगुण स्वतःच्या घरात जबरी चोरीचा बनाव करणारी सुन व तिला मदत करणारे साथीदार अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 12, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाने केला जबरी चोरीचा पर्दाफाश..“सासूला मारहाण करण्यास सांगुण स्वतःच्या घरात जबरी चोरीचा बनाव करणारी सुन व तिला मदत करणारे साथीदार अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे पुणे हद्दीतील मिठानगर येथे फिर्यादी सौ. बिलकिस मोहम्मद ईसाक शेख, हया त्याच्या कुटुबीयासह राहण्यास असुन त्या दि.०२/०२/२०२३ रोजी त्याचे पती मोहम्मद ईसाक, सुन हुमेरा व ६ महिन्याच्या लहान मुलासह घरात होते. तसेच बाकी कुंबीय कामानिमित बाहेर गेले होते. त्यावेळी त्याचे पती मोहम्मद ईसाक हे मुलांना आनण्यासाठी शाळेत गेले असताना दोन अनोळखी इसम घरात येवून सौ. बिलकिस याच्या तोंडावर टॉवेल गुंडाळून त्याच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व सुनेच्या गळयातील गंठण हे जबरदस्तीने चोरी केले होते. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे येथे सो. बिलकिस मोहम्मद ईसाक शेख यांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपो याचा शोध घेण्याबाबत संतोष सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी आदेशीत केले होते.. त्याप्रमाणे तपासपथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, तपास पथक अंमलदार अमोल हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिचकर, राहुल रासगे, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, सुहास मोरे, विकास मरगळे असे शोध घेत होतो..

अनोळखी आरोपी यांच्याबाबत फिर्यादी यांच्या सोबत गुन्हा घडताना घरात असणारी त्याची सुन हुमेरा आवेश शेख वय ३० वर्षे, हिच्याकडे तपास करित असताना ती तपासात उडवाउडवीची व असमाधान कारक उत्तरे देत होती. त्यावेळी सदर भागात सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये तीन इसम हे गुन्हा केल्यानंतर गुन्हयाच्या घटनास्थळावरुन पळून जात असल्याचे पोलीस अंमलदार महेश वाघमारे यांना दिसले तसेच त्यांनी तांत्रिक विलेषणाच्या आधारे व गुप्त माहितीने कर्नाटक गुलबर्गा येथे राहणारे इसम १ ) कासीम बुरानसाव नाईकवडी वय २१ वर्षे धंदा मजूरी राजेवरगी झोपडपट्टी मक्का मस्जिद बाजूला ता. जेबरगी जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक २) मेहबुबसाव अलसाब बदरजे वय २५ धंदा टायरवर्क रा. निलकोड ता. जेवरगी जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक ३) अब्दूल दस्तगीर मुल्ला वय १९ वर्षे धंदा इलेक्ट्रीशन रा. गाव येड्राम आंबेडकर चौक ता.येड्रामी जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक यांनी गुन्हा केला असल्याचे निष्पन्न केले. त्यांना कर्नाटक गुलबर्गा येथून ताब्यात घेवून अटक करुन त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी फिर्यादी याचे सुनेला तिचे सासु ही कौटुंबिक कारणावरून वेळोवेळी मानसिक व शारिरिक त्रास देत होती तसेच तिचे सोन्याचे दागिणे हे तिला देत नव्हती त्यामुळे तिने आरोपी कासीम बुरानसाब नाईकवडी याला तिच्या घरातून दागिणे चोरी करण्याबाबत सांगितले होते.

चोरीबाबत प्रथम प्लॅनिंग करताना आरोपी कासीम बुरानसाब नाईकवडी याला तिचे सासरे हे एसटी महामंडळ येथून रिटायर झाले असल्याने तिच्या घरात पेशन विभागातुन आले असल्याचे सांगुण घरात यायचे, त्यावेळी ती तिच्या सास-यांना झेरॉक्स आनण्यासाठी बाहेर पाठविणार तेव्हा तिच्या घरात जावून तिच्या सासूच्या व तिच्या गळयातील मंगळसूत्र जबरदस्तीने घेवुन जाण्यास सांगितले होते. सदर दागिणे हे ती कर्नाटक येथे आल्यावर आरोपी हयाच्याकडुन घेणार होती त्याच्या बदल्यात ती त्यास मोबदला म्हणून १० हजार रुपये देण्याचे ठरले होते त्याप्रमाणे दि.३१/०१/२०२३ रोजी आरोपी कासीम याने महिलेच्या घरी दागिणे चोरी करण्याच्या उद्देशाने आला असता महिलेल्या सास-यांना त्याच्या बोलण्यावरुन तो सरकारी नोकर नसल्याबाबत संशय आल्याने त्यास हकलून दिले होते. त्यानंतर महिलेने आरोपी यांच्याबाबत दुसरा प्लॅन दि.०२/०२/२०२३ रोजी केला की, ती तिची सासू, सासरे व लहान ६ महिन्याचा मुलगा घरात असताना ती तिच्या सास-यांना मुलाना शाळेतून आणण्यासाठी बाहेर पाठविणार त्यावेळी घरात जावुन सासूच्या तोडाभवती टॉवले गुंडाळुन मारहाण करुन तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व तिच्या गळयातील गंठण जबरदस्तीने चोरी करून घेवून जाण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे दुसरा प्लॅन करुन त्याप्रमाणे कासीम व त्याचे दोन साथीदार यांनी महिला आरोपी हिच्या मदतीने चोरी केली असल्याचे आरोपी यांनी कबुल केले. महिला आरोपी हुमेरा हो मुख्य सुत्रधार असल्याने तिला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी कडुन दोन
सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या आहे. गुन्हा करण्यासाठी आणखीन कोणी मदत केली आहे का?

याबाबत अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे हे करित आहेत.

Previous Post

धनोजे कुणबी समाजाच्या वतीने आयोजीत “कृषी महोत्सवाचे” वन मंत्री. मुनंटीवार याच्या हस्ते झाले थाटात उदघाटन.

Next Post

बीड शहरमधील आठवडी बाजार तळाची होणार आता स्वच्छता..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बीड शहरमधील आठवडी बाजार तळाची होणार आता स्वच्छता..

बीड शहरमधील आठवडी बाजार तळाची होणार आता स्वच्छता..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In