वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडी मोठी कारवाई केली आहे. त्यात पुणे येथील माजी आमदार अनिल भोसले यांची 26 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता ईडी जप्त केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भोसले यांनी ठेवीदारांच्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केली होती. याच प्रकरणात सध्या कारागृहात आहेत.
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील सुमारे ७१ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अंमलबजावणी संचालनालयाने ईडी अटक केली होती. यासर्वणी बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना तुरुंगात पाठवले आहे.
शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने माजी आमदार अनिल भोसले यांची चौकशी केली होती. अखेर या प्रकरणात त्यानंतर आता भोसले यांची पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २६ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त केली आहे.
गैरव्यवहार प्रकरणात ईडीने माजी आमदार अनिल भोसले यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा ही दाखल केला होता. काळा पैसे हस्तांतरण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती समोर आली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348