वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हा तून एक दुर्दैवी संतापजनक घटना समोर येत आहे. हुड्यासाठी एका नवविवाहित तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना समोर येताच संपूर्ण पुणे जिल्हात खळबळ उडाली आहे. ही घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पतीसह सासू- सासऱ्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हर्षदा बधे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित तरुणीचे नाव आहे.
नव विवाहिता हर्षदा बधे तिचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती आनंद बधे, सासू रंजना, सासरे कल्याण तिघे रा. मातोश्री निवास, संकेत विहार सोसायटी, फुरसुंगी, हडपसर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वर्षा शिवरकर वय 22 वर्ष राह. वाघोली यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद आणि हर्षदा यांचा गेल्यावर्षी मे महिन्यात विवाह झाला होता. विवाहानंतर तिचा हुंड्यासाठी छळ सुरू करण्यात आला. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे छळामुळे हर्षदाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक टी. एन. खळदे पुढील तपास करत आहेत.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348