मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- जिल्हा तून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. मनमाड – लासलगाव रेल्वे स्थानकालगत सोमवारी सकाळी वीज वाहिनी ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या इंजिनने टॉवर उडवल्याने चार गँगमन कर्मचाऱ्यांचा जाग्यावर दुर्दैवी मृत्यू झाला. इंजिन चुकीच्या दिशेने गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी रेल रोको आंदोलन केलं.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास खांब क्रमांक १५ ते १७ दरम्यान रेल्वेचे कर्मचारी देखभाल दुरुस्तीचे काम करीत होते. यावेळी लासलगावकडून उगावकडे निघालेले वीज वाहिनी दुरुस्तीचे काम करणारे इंजिन चुकीच्या दिशेने गेल्याने हा अपघात झाला. यात इंजिनच्या धडकेत गँगमन संतोष केदारे वय ३० वर्ष, दिनेश दराडे वय ३५ वर्ष, कृष्णा अहिरे वय ४० वर्ष व संतोष शिरसाठ वय ३८ वय यांचा मृत्यू झाला. मृतांमधील एक जण मनमाडचा आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. संतप्त कर्मचाऱ्यांनी रेल रोको केला. गोदावरी एक्स्प्रेस २० मिनिटे रोखून धरली. मग रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या मधस्तीने हे आंदोलन निवळल.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348