पोलीस पाटील यांना पायउतार करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून मागणी.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन धाबा:- गोंडपिपरी तालुका अंतर्गत येत असलेल्या चेकबापूर येथील महिला पोलिस पाटील भाग्यश्री मुत्येमवार यांचा गावातील मनमानी कारभार बघता त्यांना पदावरून पायउतार करण्याची मागणी संतोष मुगलवार ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गावात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. असे असताना देखील सकमुर येथील पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेली महिला भाग्यश्री मुत्येमवार यांनी गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्याएवजी पक्षपात करीत वाद लावण्याची कामे करीत आहे. गावातील सार्वजनिक कामात नेहमीच अडथळा निर्माण करीत असतात. गावात कुठलेही कार्यक्रम आयोजीत केले असता नेहमीच अडथळा निर्माण करीत असतात. तर दुसरीकडे जवळील व्यक्तींनी कुठलेही बेकायदेशीर काम केले तरी मात्र त्यांना पाठीशी घातले जात आहे. एकंदरीत पक्षपात करीत असल्याचे स्पष्ट निदर्शनास येते. यामुळे या महीला पोलीस पाटील पदाचा दुरुपयोग करीत आहेत. यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सदर महीला पदाचा गैरवापर करीत आहे. यामुळे संतप्त गावातील नागरिकांनी या महीला पोलीस पाटील यांना पदावरून पायउतार करावे, अशा मागणीचे निवेदन उप विभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

