सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक 15 फेब्रुवारी रोजी संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी. भगत (मुख्याध्यापक), प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक), यु. के. रांगणकर (शिक्षक) यांची मंचावर उपस्थिती होती. प्रथमता: संत श्री सेवालाल महाराज यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण करताना एस. एम. चव्हाण यांनी सांगितले की, भानामती, सतीप्रथा, बळीप्रथा आदी बाबींचा विरोध करून संत श्री सेवालाल महाराज यांनी समाजाला योग्य दिशा दिली. गावागावात घोडेस्वारी करून समाजाला वाईट आणि चांगले विचार पटवून दिले. पिण्याच्या पाण्याचे महत्व पटवून दिले. श्री. यु. के. रांगणकर सर यांनी सांगितले की, संत श्री सेवालाल महाराज यांनी समाज प्रबोधन करण्याचे काम केले आणि समाजाला तांडाच्या माध्यमातून एकत्रिकरण करून अनिष्ट प्रथा हटविल्या. प्रमुख पाहुणे श्री. एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक) यांनी सांगितले की, संत श्री सेवालाल महाराज यांनी जनजागृती करून समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बी. बी. भगत (मुख्याध्यापक) यांनी सांगितले की, संत श्री सेवालाल महाराज यांनी केलेले कार्य समस्त मानव जातीला दिशा देण्याचे आणि समाजाचे कल्याण करण्याचे कार्य आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस. एम. चव्हाण, संचालन सौ. एस. एन. लोधे मॅडम व आभार श्री. आर. के. वानखेडे यांनी मानले.
या कार्यक्रमात श्री. आर. बी. अलाम (शिक्षक) व श्री. दिनेश भाले, श्री. जगदीश कांबळे, श्री. वाल्मीक खोंडे, श्री. वामन बोबडे, श्री. इंद्रभान अडबाले आदी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसहित विद्यार्थ्यांची प्रामुख्याने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

