पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाइन पुणे :- दि. ०५/०२/२०२३ रोजी गोल्ड इंपेरियल बिल्डिंग, होलमार्ट कोथरुड येथील दुकानाचे शेजारी रोडवर ज्येष्ठ महिला एकटी उभी असल्याचा फायदा घेवून अॅक्टिव्हा गाडीवरून जॅकेट, मास्क, टोपी परिधान करून आलेल्या अनोळखी चोरटयाने महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने हिसकावून पळून गेला होता. सदर घटनेबाबत जबरी चोरीचा कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुरनं ४६ / २०२३ भादवी कलम ३९२ प्रमाणे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेणेबाबत गा. वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले होते.
त्याप्रमाणे मा. वपोनि, कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी दिले सुचनांप्रमाणे तपास पथकातील अधिकारी, पोलीस अंमलदार विशाल चौगुले, आकाश वाल्मीकी विष्णु राठोड यांनी गुन्हा घडलेपासुन अहोरात्र प्रयत्न करून आजु बाजुचे पसिरातील ५४ सीसीटीव्ही कॅमे-यांची पाहणी करून चोरट्याने वापरलेले पांढरे रंगाचे अॅक्टिव्हा मोटार सायकलचे नंबरबाबत खात्री करून अनोळखी चोरट्याबाबत लोहगाव विमाननगर, कोथरुड परिसरामध्ये अनोळखी चोरटयाची माहिती घेवुन इसम नामे सचिन नथु पोळ वय ३९ वर्षे रा. उजवी भुसारी कोथरुड, पुणे यांस गुन्ह्यामध्ये अटक करून आरोपीकडून गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगीरी मा.पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, गा.सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री राजेंद्र डाहले मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ३, पुणे शहर श्री. सुहेल शर्मा व मा. सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर श्रीमती रुक्मिणी गलंडे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरुड पोलीस ठाणे श्री. हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे, कोथरुड पोलीस ठाणे सपोनि समीर चव्हाण, पोउपनिरी बसवराज माळी तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार विशाल चौगुले, योगेश सुळ, विष्णु राठोड, आकाश वाल्मिकी, अजय शिर्के, संजय दहिभाते, शरद राऊत मंगेश शेळके यांनी केलेली आहे.