पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाइन पुणे :– मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणून कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करून संघटीत गुन्हेगारी करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. पुणे शहरातील भारती विद्यापीठ व सहकारनगर पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे अजिंक्य संतोष काळे वय २१ वर्ष रा. स.नं. २५/२ गणेशनगर, आंबेगाव पठार, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह भारती विद्यापीठ व सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अग्निशस्त्र लोखंडी चाकू, लोखंडी कोयता या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाबा प्रयत्न, इच्छापूर्वक जबर दुखापत करणे, जबरी चोरी, दंगा, बेकायदा अग्निशस्त्र व हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाये गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करून श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर ज्यांनी नमूद इसमाचे विरुद्ध एम. पी.डी.ए. कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व श्री. विजय कुंभार, परिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, श्रीमती सुरेखा वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर, यांनी कामगिरी पार पाडली,
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणाया व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आजपर्यंत मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही ४ वी कारवाई असून, यापुढेही सराईत त अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.