प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या उपस्थितीत झाला पक्ष प्रवेश.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पळसगाव (बाई) येथील अनेकांनी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यामुळे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँगेस मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते आहे.
स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’, सुभाषजी चौधरी, अमोल बोरकर, मारोती महाकाळकर, उपसरपंच मंगेश गिरडे, तालुका उपाध्यक्ष शरद कुळसंघे, गोकुळ टिपले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा महासचिव राजू मुडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी माजी सरपंच सुळसाताई मांडे, माजी ग्रा.सदस्य प्रमोद देवतळे, ग्रा.प. सदस्य लक्ष्मीताई इरपाचे, ग्रा.प. सदस्य गजानन धाबडधुसके, कृषिमित्र रोशन सातपुते, सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ भट्ट, देवीदासजी अटकरे, अस्लम शेख, कब्बडी मंडळ संघटना अध्यक्ष महेंद्र कुडमेथे, राकेश बोरकुटे, चहमंती कुत्तरमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुप्पटा घालून पक्षांत प्रवेश केला.
यावेळी बोलताना अतुल वांदिले यांनी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याने अनेक युवक प्रभावित होऊन विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षात प्रवेश करीत आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जुळणारा कार्यकर्ता हा तळगळातील कार्य करणारा असतो. आज या सरकारने सत्तेचा गैरवापर करत ही सरकार स्थापन केले आहे महाराष्ट्रात बेरोजगारी, दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, बेरोजगार युवकांना रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे या केंद्र सरकार व राज्य सरकारला तोंडघशी पाडायला सर्व जनतेला एकत्रीत येण्याची गरज आहे असे प्रतिपादन अतुल वांदिले यांनी यावेळी केले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

