पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- वानवडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री भाऊसाहेब पटारे यांचे सुचनांप्रमाणे वानवडी तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले व पो. अम. विनोद भंडलकर, संतोष नाईक, महेश गाढवे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार व विठ्ठल चोरमले असे पोलीस ठाणे हद्दीत वारंवार घडत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करणेकामी सतर्कतेने पेट्रोलिंग करीत असताना पो. अंम. अमोल गायकवाड व विष्णु सुतार त्यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रामटेकडी वानवडी परिसरात घरफोडी व वाहनचोरी करणारी मुले ही रामटेकडी डोगंरांवरील पाण्याचे टाकीजवळ थांबलेले असुन ते दोन गटांत तेथे थांबलेले आहेत. तसेच त्यांचेकडे चोरीची दुचाकी असलेलेबाबत मिळालेले बातमीवरून वानवडी पोलीस स्टेशनकडील वरील अधिकारी व अंमलदार यांनी सदर भागांत सापळा रचून प्रथम खालील आरोपीतास ताब्यात घेवुन त्यास अटक करण्यात आलेले आहे,
१) अरबाज युसुफ शेख, वय २२ वर्षे, धंदा, पेंटींग, रा. गल्ली नं.९, मिटानगर, कोंढवा, पुणे वरील आरोपीस वानवडी पो.स्टे.गु. रजि. नं.८८/२०२३ आ.दं.वि. कलम ३७९,३४ गुन्हयांत अटक करून नमूद आरोपींनी चोरी केलेली एकुण २,६१,०००/- रु. कि. चे ०४ चाहने जप्त केलेली असुन त्याचे अल्पवयीन साथीदारांकडुन २५,०००/-रुपये किंमतीचा एक मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आलेला आहे. त्याबाबत दाखल असलेले वानवडी पोलीस ठाणेकडील २ गुन्हे, सहकारनगर पोलीस ठाणेकडील १ गुन्हा व कोंढवा पोलीस ठाणेकडील १ गुन्हा असे एकुण ४ गुन्हे उघडकीस आणले असुन त्यांनी चोरी केलेले मोबाईलबाबत अधिक तपास चालू असुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
तसेच दुस-या कारवाईत घर फोडी करणारे ०२ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून त्यांचेकडे विश्वासपूर्ण वातावरणात तपास केला करून, त्यांचे कडुन त्यांनी वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ७३/२०२३ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० मधील चोरी केलेला काही मुद्देमाल हस्तगत केलेला असुन त्यांनी दोघांनी मिळुन चोरी केलेली एक लाल अॅक्टीवा गाडी क्र. एम. एच. १२ पी. आर. ८०८९ ही हस्तगत करण्यात आलेली असून तिचे संबधीत दाखल असलेला खडकी पोलीस ठाणेकडील वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणुन अशाप्रकारे त्यांचेकडुन किं.रु. ५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन त्याबाबतचे एकुण ०२ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सहपोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि.- ५, पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, व मा. सहा. पोलीस आयुक्त चानवडी विभाग पुणे शहर सौ. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले, पो.अम. अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, संतोष नाईक, महेश गाढवे, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले व मनिषा सुतार यांनी केली आहे.
तसेच दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले हे स्वतः करीत आहेत.

