संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तहसिल कार्यालयात महत्वाच्या टेबलवर महिला कर्मचारी असून महिलांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तहसिल कार्यालयातील महिला कर्मचारी सोनाली लांडे मॅडम नागरिकांसोबत असहकार्याच्या भावनेतून वागत असल्याने नागरिक कमालीचे नाराज होत असून या मॅडम एवढ्यावरच न थांबता तहसिलदार यांची धमकी देत नागरिकांना घाबरवीत असल्याने नागरिक गोंधळून गेले आहेत याची दखल घेत गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने निवेदन देऊन लांडे मॅडम यांचेवर कार्यवाहीची मागणी केली आहे.
लांडे मॅडम पगार शासनाचा घेतो मात्र त्याच नागरिकांना जवळ येऊन आपल्या कामाबाबत विचारणा करू देत नाही कुणी आपल्या कामाची विचारणा केल्यास त्यांच्यावर गरम होऊन तूम्ही माझेकडे यायचे नाही, तहसिलदार ला भेटा, मला काही देने घेणे नाही, असे सांगून नागरिकांत दहशत निर्माण करीत आहेत.
लांडे मॅडम हे शासनाचे पगार घेत असून त्यांचा पगार गोरगरिबांच्या टॅक्स मधून होत असते याची साधी कल्पना सुद्धा त्यांना नाही यामुळे नागरिकां सोबतच्या असहकार्याच्या भावनेतून वागण्यामुळे नागरिकांच्या संविधानिक हक्काचे हनन होत आहे. या प्रकरणात गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे कार्यकर्ते संतोष कुलमेथे यांनी तक्रार करून कार्यवाहीची मागणी केली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

