नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई/ठाणे:- आज निवडणूक आयोगाने राज्यातील सर्वात महत्वपूर्ण राजकीय निकाल दिला. त्यामुळे कही खुशी कही गम अस वातावरण दिसून येत आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदे गटात खुशी तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटात गम दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकाल नसते मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद आश्रम येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांचे आशिर्वाद घेतले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र संदेश न्युजचा प्रतिनिधी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, भारत मुख्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर आज ठाणे शहरातील टेंभीनाका येथील आनंदआश्रम येथे उपस्थित राहून वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांचे आशिर्वाद घेतले.
विचारांशी काडीमोड घेऊन असंगाशी संग केल्यामुळे सुरू झालेल्या ह्या लढाईत आज एक मोठा विजय आम्हाला मिळाला असून केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव दोन्ही आम्हाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासोबतच येणाऱ्या जबाबदारींचे भान आम्हाला आहे. त्यामुळे विचारांचा हा वारसा जपत आणि ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्रासाठी पुन्हा एकदा सर्वस्व अर्पण करत संघर्ष करण्याची नवीन ऊर्जा आणि बळ आम्हाला मिळाले आहे. याप्रसंगी माझे ठाणे शहरातील शिवसेनेचे हजारो कार्यकर्त्यांसह नेते उपस्थित होते.