✒️ राहुल फुंदे शिर्डी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन शिर्डी:- समृद्धी महामार्ग, वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता आपल्या शिर्डी विमानतळाला DGCA कडून आता ‘नाईट लँडिंग’ परवाना मिळाला आहे. लवकरच म्हणजे मार्च/एप्रिल 2023 पासून एअरलाइन्सनी रात्रीची विमानसेवा सुरू करणे अपेक्षित आहे. सध्या शिर्डीला 13 विमानसेवा आहेत. यात आता अधिक वाढ होणार आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, 2017 मध्ये या संदर्भात काम करून शिर्डी विमानतळ सुरू करण्यात आले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पुन्हा एक मैलाचा दगड गाठला.
यावेळी गावातील नागरिकांनी सदैव पाठिंब्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझी विनंती त्वरीत पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे मनःपूर्वक आभार !
या परवानगीमुळे जगभरातील साई भक्तांसाठी शिर्डी यात्रा सुलभ आणि जलद होईल. या परिसरातील आणि आसपासच्या भागातील आर्थिक विकासाला चालना मिळेल.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348