✒️उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- समाज हा भोळाभाबडा व अंधश्रद्धाळू आहे. त्याला अज्ञानात ठेवूनच त्याचा गैरफायदा आज अनेक धार्मिक संस्था उठवित आहे. विज्ञानयुगात, विज्ञानाच्या प्रखर प्रकाशात चमत्काराची दुकानं राजरोसपणे चालवत असल्याची माहिती समोर येत असते. अशीच एक घटना सांगली येथून समोर येत आहे. ज्या गौतम बुद्धाने देवाचे अस्तित्व अवतार यासर्वाला नाकारून प्रज्ञा, शिल, करुणा, अहिंसा, श्रमा, शांती चा मार्ग समुच विश्वाला दाखवून हिंसा, अंधश्रद्धा कर्मकांड, देव याला प्रखर विरोध केला. आज गौतम बुद्धाचा फोटो लाऊन त्याचा नावाने समाजात देवाचा अवतार झाल्याचे सांगून अंधश्रद्धा पसरविण्याचे सांगली येथे ब्रम्हकुमारी या संस्थेने काम सुरू आहे.
सांगली येथे ब्रम्हकुमारी या संस्थेतर्फे एक विवाधित पोस्टर छापण्यात आले आहे त्यात गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, महावीर, गुरुनानक, कृष्ण, शंकरजी याचे फोटो त्यात टाकण्यात आले. त्यात शिव भगवान उवाच नाही ! परमात्मा शिव आपना सर्वाचे परमपिता आहेत, संपूर्ण विश्वात भारत सर्वात महान देश आहे. कारण याच भूमीवर परमात्म्याचे दिव अवतरण होते. माउंट अबू (मधुबन) सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे. हीच ती महान भूमी आहे जिथे परमात्म्याचे दिव अवतरण झाले आहे. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरविण्याऱ्या गोष्टी त्यात टाकून लोकांना धार्मिकतेच्या आडून फसविल्या जात आहे.
देवाने अवतार घेतला असे विवादित पोस्टर छापण्यात आल्यामुळे अनेक आंबेडकरवादी संघटनेने यावर आपक्षेप घेतला आहे. अशा संस्थेवर कारवाई करावी असं सांगण्यात येत आहे. नाहीतर याच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असे सांगली येथील विविध आंबेडकरवादी संघटनेने सांगितले.
अंधश्रद्धा हे मानवी समाजाला लागलेला अभिशाप आहे. देवाने अवतार घेतला या अंधश्रद्धेच्या नावाखाली ब्रम्हकुमारी संस्थांचे लोक आज समाजाची फसवणूक करत आहे. देव्यवाद, अवतार या खोट्या विचार धारणेवर विश्वास ठेवून ब्रम्हकुमारी सारख्या फसव्या भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अंधश्रद्धाळू माणूस आपली विचारशक्ती हरवून बसलेला आहे. त्यामुळे अशा व्यक्ती खोट्या विचार साधनेला बळी पडत आहे.
तसेच ढोंगी बाबा साधु, महंत महाराज यांसारखे लोक विविध देवाचे अवतार सांगून ग्रामीण भागापासून ते त्यांच्या अंधश्रद्धेला सुरुवात करतात. ग्रामीण भागातील लोक हे अशा ढोंगी बाबांवर लवकर विश्वास ठेवता त्यातून अंधश्रद्धेचा जन्म झाला आहे. त्यामुळे आई, वडील, गुरुजन आणि देव यांच्यावर श्रद्धा ठेवावी, यांच्याविषयीची शब्दही खचितच अभिमानास्पद बाब आहे. पण कोणत्याही सध्याचा अतिरेक हा शेवटी अंधश्रद्धेत परिनीती होऊन समाजाला हानिकारक ठरतो. बुवा, साधू, महंत, महाराज यांच्याकडून फसवल्या गेलेल्या अनेक वार्ता आपल्या कानावर येतात, तेव्हा असं लक्षात येतं की, अजूनही आपल्या प्रगत समाजाला अवतार या अंधश्रद्धेच्या निबिड अंधारात चाचपडत आहे.
समाजात अवतार झाल्याचा थोतांड गोष्टी सांगून लोकांना अशा संस्था फसवणूक करत आहे. त्यासाठी विविध धर्माच्या संस्थापक यांच्या फोटोचा सर्हास वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अशा संस्था वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348