विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अस्तगाव:- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वाल्मीकराव गोर्डे हे होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने विद्यालयात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार आज पासून संपूर्ण महाराष्ट्रात कवी शाहीर साबळे यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्य गीत म्हणून स्वीकारले असून त्याचे सामुदायिक गायन करण्यात आले. तसेच शिवरायांच्या संस्कृतीचा वारसा जोपासण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थी कलाकारांनी हलवा पाळणा बाल शिवाजीचा…. तसेच जय जय महाराष्ट्र माझा या गीतांवर आकर्षक अशा प्रकारचे नृत्य सादर केले. विद्यालयातील विद्यार्थिनी श्रद्धा गोर्डे हिने शिवरायांचा पोवाडा गायन केला. तर मयुरी पोकळे हिने शिवरायांच्या कार्याविषयी माहिती दिली. छोटी बालिका ऋतुजा लोंढे हिने शिवरायांवर आपले विचार व्यक्त करून उपस्थितांची मने वेधून घेतली.
अस्तगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त होणारा इतर प्रकारचा खर्च टाळून विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आकर्षक व मजेदार अशा चमचा लिंबू, पोता शर्यत, स्लो सायकल , चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उत्कृष्ट प्रकारचे रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सचिन चौधरी, कृष्णकांत अंत्रे, संतोष कदम, किरण आंबेकर, ज्ञानेश्वर केदार, निर्मला लावरे, छाया जेजुरकर, वृषाली बेल्हेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत गोर्डे यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या कार्याची महती सांगून त्यांचे विचार केवळ वाचण्याची नव्हे तर आचरणात आणण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रमोद तोरणे यांनी केले. कार्यक्रमास सरपंच सविता चोळके, नंदकुमार जेजुरकर, अनिल नळे, श्रीनिवास त्रिभुवन, आर. बी. चोळके, मच्छिंद्र चोळके, पंकज गोर्डे, गौतम गोर्डे, सतीश त्रिभुवन तसेच विद्यालयातील सर्व सेवकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कविता घोडसरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे
आभार मुख्याध्यापक वसंत शिंदे यांनी मांडले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348