संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा:- जागतिक आदिवासी दिन राजुरा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल. शहरातील सर्व आदिवासी समाजाने एकत्र येऊन विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी केले होते.
आदिवासी दिनानिमित्य भव्य रैली व महाप्रसादचा कार्यक्रम सोमनाथपुर आठवड़ी बाजार वीर बाबूराव पुल्लेसूर शेडमाके चौक राजूरा इथे आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे विदर्भ सचिव महिपा मड़ावी, विदर्भ प्रसिद्दी प्रमुख शुभमभाऊ आत्राम, तालुका अध्यक्ष विनोद गेडाम, जिल्हा कार्याध्यक्ष रविन्द्र आर पी आत्राम, तालुका कार्याध्यक्ष अंकुशजी कुलमेथे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप भाऊ गेड़ाम, जिल्हा उपाध्यक्ष नितिन सिडाम, रावण सेनेचे तालुका अध्यक्ष आनंद सिडाम, माजी नगर सेवक भाऊजी कांनाके, शालिक पेंदोर, शंकर कुडसंगे, मनोहर गेडाम, प्रभाकर कांनाके, राजकुमार सिडाम, भाबुरव कांनाके व सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते.