प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले याच्या हस्ते कव्वालीचे उद्घाटन..
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- कौमी एकता कमेटी द्वारा आयोजित शाम -ए- गजल या कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती, कॉटन मार्केट येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाम -ए- गझल या कार्यक्रमाला कव्वाल सलीम जावेद बंगलोर तर परवीन सुलताना मुंबई यांच्या गझल व कव्वालीच्या आवाजानी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कव्वाली ची जुगलबंदी रात्री उशिरा पर्यंत चालली या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
या कार्यक्रमाला आंबेडकर विद्यालयाचे सचिव अनिल जवादे, माजी नगरसेवक प्रलय तेलंग, सरचिटणीस दशरथ ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश धोटे, माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे, समाजसेवक राहुल मोटवाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, अविनाश नवरखेडे, पत्रकार इकबाल भाई, यांचे आयोजक कमिटी च्या वतीने शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन काझी सर यांनी केले तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कौमी एकता कमिटीचे अध्यक्ष लतीफ मलनस, सचिव अंकित ढगे, कोषाध्यक्ष अजहर शेख, सिद्धार्थ मस्के, उपाध्यक्ष गुजरभाई, अमिनभाई, दिपक भालेराव, अंसारउल हक, इमरान खान आदींनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमात शहरातील अनेक प्रतिष्ठीत लोकांनी हजेरी लावली.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

