✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई, 20 फेब्रुवारी:- शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाच्या ताब्यात गेल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री ठाकरे गटावर मोठी नामुष्की आली आहे. तर दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विखारी टीका केली होती. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या डिस्कॉलिफिकेशन करण्याची चर्चा रंगली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संजय राऊत यांच्या खासदारकीबद्दल चर्चा झाली. संजय राऊत यांचं डिसकॅालिफिक्शन कसे होईल याबाबत बैठकीत चर्चा झाली.
‘संजय राऊत सायको आहेत, त्यांच्यावर काय बोलायचे. हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार. कुत्रं पिसाळलं तर कुत्र्याला चावले जात नाही त्याला औषध देवून शांत केले जाते, असं सूचक विधान शिरसाट यांनी केलं.
तसंच, आम्हाला पार्टी फंड नाही तर शिवसेना नाव आणि चिन्ह बाबत घेणे देणे होते. शिवसेनाभवन आमच्या करता मंदीर आहे. काही लोकांना ती खाजगी संपत्ती वाटते. ज्यांना पैशांचा लोभ हे ते त्या बद्दल विचार करतील. शाखेच्या आदला-बदल काहीही होणार नाही, शिवसैनिकांमध्ये कोणताही वाद होणार नाही, अशी ग्वाहीही शिरसाट यांनी दिली.
निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निर्णय दिल्याने शिवसेनेचे सर्व कार्यालय आमचे आहेत. व्हिप बजावला जाईल तो सर्वांना बंधनकारक होईल. सर्व ५६ आमदारांना व्हिप बजावला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हा व्हीप बजावला जाईल. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून हा व्हीप असणार आहे. हा व्हीप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सुद्धा लागू असणार आहे.
त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हावर जे आमदार निवडून आले त्या सगळ्या आमदारांना हा व्हीप लागू होईल. जर कुणी व्हीप पाळला नाही तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशाराच गोगावले यांनी दिला. यामुळे ठाकरे गटातील आमदार शिवसेना शिंदे गटाचा व्हीप मानणार की धुडकावणार यावरुन राजकारण तापणार आहे.

