महाराष्ट्र संदेश न्युज सांगली शहर प्रतिनिधी उषा कांबळे यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला.
✒️उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ विहार सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, याच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली.
त्यानंतर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेबद्दल प्रा. जगन कराडे सर यांचा सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय समाज भूषण व सावित्री माई फुले पुरस्कार प्राप्त झालेबद्दल आयु. दिपा श्रावस्ती मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट संदेश न्युज सांगली शहर प्रतिनिधी म्हणून निवड झालेबद्दल आयु. उषाताई कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. शाळेची सहल गेली असता एक मुलगी स्वामींग टॅंक मधील पाण्यात पडली, तिला वाचवण्यासाठी धैर्य व ध्रुव साबळे या दोघानीं पाण्यात उडी मारून त्या मुलीला वाचवले याबद्दल दोघांना शौर्य पुरस्कार देण्यात आला. क्रांतिकारी चारित्र्य या परीक्षेत 2500 विद्यार्थ्यामध्ये प्रथम क्रमांक आलेबद्दल सुर्वी मधाळे हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदित्य बुल्ले सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज याचे कार्य, त्याचा इतिहास समजून सांगितला. त्यानंतर दि.18 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या अ) रांगोळी स्पर्धा, ब) प्रश्न मंजुषा, क) वक्तृत्व स्पर्धा ड) संगीत खुर्ची अशा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना महापुरुष, महामाता याच्या विचारांचे पुस्तक व लेखणी देण्यात आली. त्यानंतर विहाराचे उपासक विजय लांडगे यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेऊन बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या कार्याचे सादरीकरण केले, हे सादरीकरण अतिशय उत्कृष्टपणे सादर केले. त्यानंतर प्रा. नरवाडे सरांनी आनंदाने नांदत होते हिंदू मुस्लिम हे गाण एकदम छान स्वरूपात सादर केले. बाल शिवाजी, माता जिजाई याच्या वेशभूषेत आलेले बालक, बालिका यांनी आपली कला सादर केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत नागवंशी सर यांनी केले, पाहुण्याची ओळख संभाजी माने सर यांनी, प्रस्तावना भारत कदम सर यांनी व कार्यक्रमाचे आभार विश्वास मागाडे यांनी केले. यावेळी विहाराचे सचिव, पवन वाघमारे, सहसचिव भारत कदम, खजिनदार संभाजी माने, संचालक उषाताई कांबळे, संजय घाडगे, चंद्रकांत चौधरी, अवंतिका वाघमारे, शैलजा साबळे, दीपमाला कांबळे तसेच विहाराचे उपासक ,उपासिका बालक तथा बालिका उपस्तिथ होत्या. यावेळी या कार्यक्रम संपन्न होणेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे विहारामार्फत आभार मानण्यात आले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348