प्रवीण जगताप हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
हिंगणघाट:- वणा नदी संवर्धन समितीच्या वतीने पि.ओ.पी पासून बनविण्यात येणाऱ्या गणेश मुर्त्यानांवर बंदी घालण्यात यावी.यासाठी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोले मॅडम तहसील कार्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.आता येणाऱ्या गणेशत्सव व नवरात्रौत्सवच्या वेळीं शहरातील लोकांना मध्ये जनजागृती करण्यासाठी नगरपरिषद मुख्य अधिकारी गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आले. गणपती विसर्जन व घट विसर्जनासाठी कृत्रिम कुंडतयार करणे.शहरात मोठ्या प्रमाणात घरगुती गणेश मुर्ती व सार्वजनिक गणपती बाप्पा असतात.वणा नदी परिसरात व शहरात जिथे जिथे कुंड तयार करण्यात येईल तेथे निर्माल्य तसेच कचरा संकलन साठी विशेष व्यवस्था करावी.त्या निर्माल्याचे नगर परिषदेच्या माध्यमातून खत निर्मिती प्रक्रिया साठी पाठवावी.त्यामुळे वणा नदी मध्ये व परिसरात घाण होणार नाही.नदी परिसर हा स्वच्छ व सुंदर राहील.नदी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्याकरिता ठाणेदार फुंडकर साहेब पोलिस स्टेशन यांना सुध्दा निवेदन करण्यात आली आहे.या अनुसंघाने मागिल तिनं वर्षी पासून शहरातील लोकांनमध्ये
गणेशमूर्ती व घट विसर्जनाचे आवाहन पालीका प्रशासनाच्या माध्यमातून कुत्रिम कुंडा मध्ये विसर्जन करण्यात यावे.याकरिता निसर्ग साथी सेवा समिती , हिंगणघाट बचाव समिती निसर्गसाथी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी रुपेश लाजुरकर, धंनराज कुंभार, अनिल भोंगाडे,सुनील डोंगरे, गंजु कुंबडे, तुषार हवाईकर, प्रवीण कंडु,राकेश झाडे, दिनेश वर्मा, अनिल मुन, दर्शन बाळापुरे, श्याम इडपवार,संजय खत्री, मनोज वासेकर ,राहुल शिंगरु,आषिश भोयर, अशोक मोरे, उमेश डेकाडे, मनोज रुपारेल, दिपक माडे, इत्यादींच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.