प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-पंचशील सहकारी संस्था सोसायटीच्या सभापती पदी सुधाकर लोणकर यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. मागील ५५ वर्षांपासून पंचशील सहकारी संस्था सोसायटी कार्यरत आहे. दिनांक २१ फेब्रुवारी ला पंचशील सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली. या सोसायटीच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माळी मॅडम यांनी कामकाज सांभाळले. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक मनोहर ढोकपांडे, विठोबाजी कामडी हे होते.
संचालक मंडळ तुकारामजी निखाडे, भूषण पिसे, मधुकरजी बालपांडे, सुनील डांगरे, लक्ष्मणराव कोटकर, श्रीधरराव वानोडे, अशोकराव बोरकर, मधुसूदन डंभारे, शशिकलाबाई मोकाशी, शारदा ढोकपांडे, लिलाबाई बावने, सुमनबाई पाटील यांची संचालक मंडळ म्हणुन निवड करण्यात आली. पंचशील सहकारी संस्थेच्या सभापती पदी सुधाकर जगन्नाथजी लोणकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे ऍड सुधीर कोठारी,रा.कॉ.पार्टी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, गिरीधर राठी, ऍड व्यास, ऍड मनीष ढोकपांडे, चेतन वाघमारे, किशोर बांगडे यांनी अभिनंदन केले.