Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात 22 वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ, डोळ्यात कानात ओतले मिरची पावडरचे पाणी, जळत्या लाकडाने चटके.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात 22 वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ, डोळ्यात कानात ओतले मिरची पावडरचे पाणी, जळत्या लाकडाने चटके.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. उच्चभ्रू पुण्यातील कोथरूड परिसरात एका नव विवाहित महिलेचा हुंड्यासाठी अमानुष छळ करण्यात आला असून, या विवाहित महिलेला मिरची पावडर पाण्यात मिसळून ते तिखट पाणी तिच्या तोंडात, डोळ्यात, कानात ओतल्याचा प्रकार घडला आहे. ते इतक्यावरच हा छळ थांबला नाही तर, तिला जळत्या लाकडाने हातावर, पायावर व ओठावर चटकेही देण्यात आल्याचे 22 वर्षीय विवाहित तरूणीने कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विवाहितेच्या छळ प्रकरणी पती नागेश कार्तीक साहेबन्ने वय 23 वर्ष, रत्ना कार्तीक साहेबन्ने वय 42 वर्ष, महादेवी जाधव 58 वर्ष, सर्व रा. कोथरूड व लिंबराज भिसे वय 58 वर्ष रा. केळेवाडी, कोथरूड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, छळ करण्यात आलेल्या पीडित महिलेबरोबर नागेश साहेबन्ने यांच्या विवाह ऑक्टोबर 2021 मध्ये झाला होता. विवाहाच्या काही दिवसांत सासरच्यांनी तिला माहेरहून हुंड्याचे पैसे आणण्यासाठी तगादा लावला. यातून शिवीगाळ करून तिला त्रास देण्यास सुरूवात झाली. तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तर, हिंसाचाराची सीमा पार करत तिचे हातपाय बांधून पाण्यामध्ये मिरची पावडर मिसळून ते पाणी तिच्या तोंडात, कानात, डोळ्यात ओतले. तिच्या अंगावर तोंडावर मिठाचे पाणी टाकले, चुलीतील पेटलेल्या लाकडाने तिच्या हातावर, पायावर, डोळ्याजवळ, ओठावर चटके दिले. दरम्यान, अत्याचार सहन न झाल्याने तिने सरते शेवटी पोलिसांशी संपर्क साधला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सासूद्वारा मारहाणीचा प्रकार..
विवाहित सुनेला सासूकडून मारहाण होत असल्याने पीडित विवाहितेने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. ही माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे मार्शल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर विवाहित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तपास सुरू आहे.

Previous Post

पंचशील सहकारी संस्था सोसायटीच्या सभापती पदी सुधाकर लोणकर यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड.

Next Post

जुगार अड्डयावर छापा टाकुन १४ इसमांवर कारवाई करून रोख १७,५००/- रू. किचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जुगार अड्डयावर छापा टाकुन १६ इसमावर कारवाई करून त्यांचेकडुन रोख  ७३,९३०/– रू. किचा मुद्देमाल जप्त.

जुगार अड्डयावर छापा टाकुन १४ इसमांवर कारवाई करून रोख १७,५००/- रू. किचा मुद्देमाल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In