शासनाकडे पाठपुरावा करून प्रलंबित मागण्या सोडविण्याचे दिले आश्वासन.
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रातिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपला आमदार सुभाष होते यांनी पाठिंबा देऊन येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज राजुरा येथे हजारो अंगणवाडी सेविका, कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात एकत्रितपणे संघर्ष करीत होत्या. या आंदोलनस्थळी भेट देऊन आ. धोटे यांनी आपला पाठिंबा जाहीर करून संबोधित केले.
राज्यातील कार्यरत अंगणवाडी कर्मचारी यांच्या गेली चार वर्षाचा कार्यकाळ लोटून गेला असताना सुद्धा अनेक मागण्यांकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅज्युएटी अंगणवाडी महिलांना मिळणारा सेवानिवृत्तीनंतरचा लाभ यास होणारा विलंब तसेच पगार वाढ इत्यादी मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून महिला कर्मचारी गेली अनेक वर्षापासून सातत्याने लढा देत आहेत परंतु सरकारला मात्र जाग येत नाही. आंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची घोषणा २६ जानेवारीला करण्याबाबत सरकारने आश्वासित केले होते परंतु प्रत्यक्षात घोषणाची अंमलबजावणी न करता दोन लाख अंगणवाडी महिलांची झालेल्या या फसवणुकीच्या विरोधात २० फेब्रुवारी २०२३ पासून राज्यातील दोन लाख अंगणवाडी महिलांनी संप पुकारला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजुरा येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपात आपला सहभाग नोंदवून दिनांक २२ फेब्रुवारी रोजी आमदार सुभाष धोटे यांना आपले निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात सरकारला जाग आणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यास भाग पाडू असे आश्वासन संपकऱ्यांना आमदार सुभाष धोटे यांनी दिले आहे.
या प्रसंगी कॉम्रेड प्रा. रमेशचंद्र दहिवडे, कॉम्रेड किशोर जामदार, शारदा लेनगुरे, विमल गावंडे, राधा सोनकुवर, सुरेखा तितरे विद्या नीब्रँड व राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील हजारोच्या संख्येने अंगणवाडी महिला कर्मचारी उपस्थित होते.